Jalna : प्रियकराच्या घरी जाऊन 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या, जालन्यातील भोकरदनमध्ये नेमंक घडलं काय?
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर गावात प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीने केली आत्महत्या... जालन्यातील भोकरदन पोलीस स्टेशन मध्ये आरोपी प्रियकर सह 5 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर गावामध्ये एका 18 वर्षीय तरुणीने प्रियकराच्या बदनामीच्या धमकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवानी गिरी असे या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून तिचा मृतदेह हा प्रियकराच्या घरी आढळून आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी आरोपी विशाल आघाम यासह 5 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणात दिलेल्या फिर्यादीमध्ये असे म्हटले आहे की, आरोपी प्रियकर विशाल आघाम आणि मयत तरुणीचे मैत्रीपूर्ण संबंध होते. परंतु या मुलीचे नुकतेच दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरल्याने हाच राग मनात धरून विशालने तिला जीवे मारण्याची आणि समाजामध्ये बदनाम करण्याची धमकी दिली होती. या धमकीला वैतागून 18 वर्षीय तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

