Pahalgam Attack VIDEO : गोळ्यांचा धाड धाड आवाज, आर्त किंकाळ्या… हल्ल्याचा आणखी एक थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर
ज्यावेळी पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यानंतर हसतं खेळतं पर्यटकांचं वातावरण अवघ्या काही क्षणात दुःखात बदलल्याचे पाहायला मिळालं. त्याचाच हा व्हिडीओ समोर आला आहे.
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बैसरन पिकनिक स्पॉटवर दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्याची घटना मंगळवारी २२ एप्रिल रोजी घडली. या दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला. पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच संताप व्यक्त करण्यात आला. हल्ला झाल्यानंतर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओमध्ये पहलगाममधील बैसरन पिकनिक स्पॉटवर काही पर्यटक पर्यटन करत असल्याचे पाहायला मिळालं होतं. मात्र त्याचवेळी काही दहशतवादी तेथे आले आणि त्यांनी बेछूट गोळीबार केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर पाच दिवस उलटून गेल्यानंतर त्याच हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून सध्या सोशल मीडीयावर देखील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दहशतवादी पर्यटक असलेल्या जागेवर आले आणि काही कळायच्या आत त्यांच्यावर बेछूटपणे गोळ्या झाडल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी गोळ्यांचा धाड धाड आवाज आणि आर्त किंकाळ्या देखील ऐकायला मिळताय.

वक्त की बात...आज तेरा... शपथ घेण्याआधीच भुजबळांचा जुना व्हिडीओ व्हायरल

भुजबळांचं मंत्रिमंडळात कमबॅक, नाराजी दूर? अशी आहे राजकीय कारकिर्द

शेवट चांगला... मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी छगन भुजबळ काय म्हणाले?

पाकमध्ये ऑपरेशन अज्ञातची चर्चा, वाँटेड अतिरेक्यांचा खात्मा करणारे कोण?
