Pahalgam Attack : हीच ती जागा जिथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर धडाधड झाडल्या गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
पहलगाममधील बैसरन पिकनिक स्पॉटवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घटनास्थळाची भयानक फोटो समोर आले आहेत. हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांचे बूट, टोप्या आणि इतर सामान घटनास्थळी विखुरले होते. तेथे उपस्थित असलेले पुरावे कॅमेऱ्यात कैद झाले. काही फोटो पाहता पर्यटक दहशतवादी हल्ल्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज बांधता येतो. त्यानंतर आता हा व्हिडीओ समोर आला.
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बैसरन पिकनिक स्पॉटवर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये एकूण २६ जणांचा मृत्यू झाला. पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. अशातच पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. पहलगाममधील बैसरन पिकनिक स्पॉटवर काही पर्यटक पर्यटन करत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. मात्र त्याचवेळी काही दहशतवादी तेथे आले आणि त्यांनी बेछूट गोळीबार केला. या दहशतवाद्यांनी काही निष्पाप पर्यटकांवर भ्याड केला. या भ्याड हल्ल्यानंतर हसतं खेळतं पर्यटकांचं वातावरण अवघ्या काही क्षणात दुःखात बदलल्याचे पाहायला मिळालं. पर्यटक आपल्या कुटुंबासोबत फिरत होते. काही लोकं बसले होते.. यावेळी या पर्यटकांना घेरलं आणि दहशतवाद्यांनी धर्म विचारत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. याचाच व्हिडीओ नुकताच समोर आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पहलगाममध्ये हल्ला झालेल्या ठिकाणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.

अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन

भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही

शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
