Ajit Pawar Post | अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

जय पवार यांनी शेअर केलेल्या फोटोत Missing you a lot Dad असे छोटेसे कॅप्शन लिहिले आहे. तर पुढच्या फोटोमध्ये जय यांनी अजित पवार यांना घट्ट मिठी मारल्याचे आणि अजित पवार हे हसतमुखाने उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत तर जय पवार यांनी अतिशय भावूक कॅप्शन लिहीली आहे. ” Dad, काश वेळ थांबली असती… मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. ” असं त्यांनी या फोटोसोबत लिहीलं आहे. दोन्ही फोटोंमधून जय पवार यांचं वडिलांसोबतच खास, घट्ट नातं दिसत असून जय पवार अजित पवार यांना प्रचंड मिस करत असल्याचं यातून दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला, गेल्या बुधवारी ( 28 जानेवारी) अजित पवार हे सभांसाठी मुंबईहून बारामतीला जात होते. मा्तर बारामती विमानतळाजवळ आल्यानंतर त्यांचं विमान क्रॅश झालं आणि स्फोट होऊन आग लागली. यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला, तसे आणखी चौघेही मृत्युमुखी पडले. सकाळी 8.45 च्या सुमारास हा अपघात झाला आणि तो दिवस राज्यासाठी काळा दिवस ठरला. अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण राज्य शोकाकुल झालं. त्यांच्या कुटुंबावर तर हा अतिशय मोठा आघात आहे.

गुरूवारी (29 जानेवारी) बारामतीमध्ये शोकाकुल वातावरणात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार आणि जय पवार, दादांच्या या दोन्ही मुलांनी सर्व विधी करत दादांवर अंत्यसंस्कार केले. त्यावेळी अतिशय भावूक वातावरण होते.
अजित पवार यांच्या जाण्यानंतर पार्थ आणि जय, ही त्यांची दोन्ही मुलं धीरोदात्तपणे या कठीण काळाचा सामना करताना दिसली. दरम्यान आता अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवार हा वडिलांच्या आठवणीत अतिशय भावूक झालेला दिसला. जय पवार यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या अकाऊंटवर अजित पवारांसोबतचे काही खास फोटो पोस्ट केले असून कॅप्शनही दिले आहे.

Follow Us