Video : राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार? महाविकास आघाडीचे नेते म्हणतात…
राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) शिवसेनेकडून सहावा उमेदवार दिल्यानंतर आता भाजपकडूनही धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी घोडेबाजार होणार असा आरोप केला जातोय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाजप घोडेबाजार करणार, असा आरोप केलाय. मात्र, घोडेबाजार होऊ नये असं भाजपलाही वाटत असेल. त्यामुळे भाजपवाले नक्कीच तिसरा अर्ज मागे घेतील […]
राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) शिवसेनेकडून सहावा उमेदवार दिल्यानंतर आता भाजपकडूनही धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी घोडेबाजार होणार असा आरोप केला जातोय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाजप घोडेबाजार करणार, असा आरोप केलाय. मात्र, घोडेबाजार होऊ नये असं भाजपलाही वाटत असेल. त्यामुळे भाजपवाले नक्कीच तिसरा अर्ज मागे घेतील असं वाटतं. अर्ज घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलाय. तर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनीही घोडेबाजार होईल असं आपल्याला वाटत नसल्याचं म्हटलंय.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

