Jayant Patil : …आता मंत्र्यांनी तातडीनं कामाला लागावं, विरोधक म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडूच : जयंत पाटील

संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना आधी खाली खेचायचं आणि मग स्वत:च्या बाजूला बसवायचं हा विरोधाभास भाजपाच (BJP) करू शकतं, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

प्रदीप गरड

|

Aug 09, 2022 | 4:53 PM

मुंबई : अखेर 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. राज्यातील मातीत गोगलगायींचा विस्तार झाला, शेतकरी हवालदील आहे. आता मंत्र्यांनी तातडीनं कामाला लागावं, असा टोला जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर लगावला आहे. त्याचबरोबर महिलांना स्थान न देणं हे बाहेरुन दिसू शकतं पण कुणाला स्थान द्यायचं, कुणाला द्यायचं नाही हे मुख्यमंत्री आणि सहकारी ठरवत असतात. या मंत्रिमंडळानं (Cabinet) उत्तम काम करावं. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडूच, असा सूचक इशाराही जयंत पाटील यांनी दिलाय. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना आधी खाली खेचायचं आणि मग स्वत:च्या बाजूला बसवायचं हा विरोधाभास भाजपाच (BJP) करू शकतं, अशी टीकाही पाटील यांनी केली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें