Jitendra Janawale Video : ‘मातोश्री’पुढं अखेरचं नतमस्तक, मनातील खदखद व्यक्त करत सोडली साथ अन् शिंदेंच्या शिवसेनेत
ज्या ठाकरेंनी आपले पदाधिकारी जितेंद्र जनावळे यांच्या हाती मशाल दिली होती, त्याच जनावळे यांनी मातोश्री पुढे डोकं टेकवत ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केला. यामागे नेमकं काय कारण ठरलं आणि ठाकरे पुढे पक्ष गळती किती मोठा आव्हान उभं आहे?
व्हिडीओमध्ये दिसणारी ही तीन दृश्य ठाकरेंच्या शिवसेनेला लागत असलेल्या गळतीची आहे. शिवसेना फुटीनंतर विलेपार्ल्याचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांना ठाकरेंनी मशाल दिली होती. त्याच जनावळे यांनी सकाळी ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर झुकून नमस्कार करत पक्ष सोडला आणि संध्याकाळी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. वैयक्तिक उद्धव ठाकरेंवर राग नसला तरी संजय राऊत आणि अनिल परब या दोन्ही नेत्यांमुळे पक्ष सोडल्याचा दावा जनावळे यांनी केला. पत्र लिहून जनावळे यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना सकाळी उद्धव ठाकरेंनी बोलावून घेतलं होतं. बैठकीत जनावळे यांनी अनिल परब आणि संजय राऊत यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि मातोश्रीतून बाहेर पडल्यानंतर डोकं टेकवून ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केला. काही दिवसांपूर्वीच सुभाष बने आणि राजन साळवी यांनी ठाकरेंच्या दोन्ही माजी आमदारांनी पक्ष सोडला. स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक यांच्या राजीनाम्यांनीही पक्षाला गळती लागली. त्यामुळे आधीच उभी फूट पडलेल्या पक्षात माणसं बांधून ठेवणं भविष्यातलं ठाकरेंपुढचं मोठं आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना भवनासमोर मराठी सेनेकडून दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र अशा अनेक प्रसंगी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा वारंवार होत आल्यात. ठाकरेंच्या हातातून पक्ष आणि चिन्ह गेले विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालाय. अनेक नेते पदाधिकारी पक्ष सोडू लागलेत ठाकरेंकडे असलेल्या अनेक नेत्यांमागे चौकशीचाच ससेमिरा आहे. अशातच मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या भविष्याची सर्वात मोठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला

'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य

डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार

'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
