Bhushan Gavai : महाराष्ट्राचा सुपुत्र सांभाळणार सरन्यायाधीश पदाची धुरा; भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश होणार
52nd Chief Justice Of India : देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राच्या भूषण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 14 मे रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत.
न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असणार आहेत. 14 मे रोजी भूषण गवई हे सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. भूषण गवई हे देशाचे 52वे सरन्यायाधीश होणार आहे. सरन्यायाधीश म्हणून गवई यांना 6 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. 13 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या गवई यांना सरन्यायाधीश म्हणून शपथ देतील. त्यानंतर 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात ते शपथ घेतील. सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर आता भूषण गवई यांचं नाव पुढील सरन्यायाधीश म्हणून आता समोर आलं आहे. भूषण गवई हे अमरावती येथील आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि एक मराठी चेहरा आता सरन्यायाधीश पदाची धुरा सांभाळणार आहे.
Published on: Apr 13, 2025 12:42 PM
Latest Videos
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?

