Kalicharan Maharaj : ‘थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस अन्..’, कालीचरण महाराजांकडून खिल्ली
मनोज जरांगे पाटील हा हिंदुत्व तोडण्यासाठी बनलेला राक्षस असून अशी टीका करत मुंबईत आलेल्या मराठा मोर्चावर देखील कालीचरण महाराज यांनी हल्लाबोल केलाय. बघा स्पेशल रिपोर्ट
कथित कालीचरण महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मनोज जरांगे पाटील हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे. लाखोंच्या संख्येने मुंबईत मोर्चा काढला, ते खातील काय? टॉटलेटला जातील कुठे टेन्शन होतं का? असं कालीचरण महाराज यांनी वक्तव्य करून मराठा मोर्चाची खिल्लीच उडवली आहे. कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आता एक आंदोलन सुरु झालं होतं माहिती आहे ना, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं. कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखोंच्या संख्येने लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्यांनी थडग्यावर चादर चढवली. यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस, असे त्यांनी म्हणत घणाघाती टीका केली. दरम्यान, बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावरून हिंदूंना जर एकजूट व्हायचं असेल तर हिंदूंमधल्या वर्णव्यवस्थेला विरोध करणार का? अशा अनेक प्रश्नावर कालीचरण महाराजांनी भाष्य केले. कोण आहेत कालीचरण महाराज….? त्यांचं खरं नाव अभिजित सराग आहे. ते अकोल्याचे आहेत. माहितीनुसार, त्यांचं शिक्षण ८ वी पर्यंत झालंय. धार्मिक कार्यासाठी काहीकाळ भैय्यूजी महाराज यांच्यासोबत इंदौर येथे वास्तव्य, २०१७ मध्ये पुन्हा अकोल्यात येऊन नगरपालिकेची निवडणूक लढवली. आता पुन्हा धर्मकार्य करत असल्याचा त्यांनी दावा केलाय.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

