कल्याण-डोंबिवलीतील प्रदूषण नियंत्रणासाठी KDMC अॅक्शन मोडवर, काय केली उपाययोजना?
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून प्रदूषण नियंत्रात आणण्यासाठी आता विकासकावर कारवाई सुरू केली असून कल्याण पूर्वेत आय प्रभागात निर्माणाधीन गृहप्रकल्पांच्या विकासकांना साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आपल्या परिसरातील विकासकांना धूळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची नोटीस
ठाणे, १४ नोव्हेंबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सुचनेनंतर राज्यात सर्वच पालिका आयुक्त जिल्हाधिकारी आणि प्रशासन सज्ज झाले आहे. विविध पथक तयार करून कारवाई देखील सुरू करत असल्याचे दिसून येत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून प्रदूषण नियंत्रात आणण्यासाठी आता विकासकावर कारवाई सुरू केली असून कल्याण पूर्वेत आय प्रभागात निर्माणाधीन गृहप्रकल्पांच्या विकासकांना साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आपल्या परिसरातील विकासकांना धूळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची नोटीस दिली. मात्र सूचना करूनही गृहप्रकल्पासाठी लागणारे बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकून ठेवले म्हणून विकासाचे पर्यवेक्षक राजेश पावशे, दत्ता गवळी यांना प्रत्येकी पाच हजार रूपयांप्रमाणे १० हजार रूपयांचा दंड साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी ठोठावला आहे तर ही कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासना कडून दिली जात आहे.