Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
राज्यात सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात मराठी भाषेच्या वापरावर भर दिला जात असताना, कल्याणमध्ये एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आता दर रविवारी रिक्षाचालकांसाठी विशेष मराठी भाषा वर्ग आयोजित करण्यात येणार असून, या माध्यमातून अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषेचे धडे दिले जाणार आहेत.

आरटीओ प्रशासन आणि रिक्षाचालक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रवाशांशी संवाद साधताना मराठी भाषेचा अधिक प्रभावी वापर करता यावा, तसेच स्थानिक भाषेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक अमराठी रिक्षाचालकांनी या वर्गांमध्ये सहभागी होण्यास उत्सुकता दाखवली आहे. मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान, दैनंदिन संभाषणातील शब्दप्रयोग आणि प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक वाक्यरचना याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
दरम्यान, परवाना रद्द होण्याच्या भीतीमुळे अनेक अमराठी रिक्षाचालक आता मराठी शिकण्याकडे गांभीर्याने पाहत असल्याचेही समोर आले आहे. या उपक्रमामुळे रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक सुलभ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि स्थानिक पातळीवर तिचा वापर वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
Published on: Jun 06, 2026 05:25 PM
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...