साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये…
पनवेलमधील कामोठे येथे एका धक्कादायक घटनेत, साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. घरी आल्यावर मुलीने आजीला ही गोष्ट सांगितली. तात्काळ कारवाई करत कामोठे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांनी पालकांना अधिकृत स्कूल बस वापरण्याचे आवाहन केले.
पनवेलमधील कामोठे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. घरी आल्यावर मुलीने आपल्या आजीला पोटात दुखत असल्याचे सांगत चालकाबाबत माहिती दिली. या गंभीर प्रकारानंतर चिमुकलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ कामोठे पोलिसांशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित स्कूल व्हॅन चालकाला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी मुलीचा वैद्यकीय तपासणी अहवाल आणि सविस्तर जबाब नोंदवून आरोपीविरुद्ध बीएनएस कलम ६५(२) सह पोस्को ऍक्ट ५एम/६(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्या मागील गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत अधिक तपास सुरू आहे. अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांना अधिकृत स्कूल बसमध्येच पाठवावे आणि बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची खात्री करावी, असे आवाहन ज्योती देशमुख यांनी केले आहे.
Published on: Sep 05, 2026 10:07 AM
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...

