Karnataka Election Result : ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’चं यंदाही पाणीपत? बेळगावसह सीमाभागात काँग्रेस, राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर
तर कर्नाटक विधानसभा निकालाचे सुरुवातीचे कल जाहीर होताच, बंगळुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष पहायला मिळत आहे. पक्षाचा झेंडा फडकावत घोषणाबाजी केली जात आहे.
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कर्नाटक विधानसभेच्या निकालात काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. तर कर्नाटक विधानसभा निकालाचे सुरुवातीचे कल जाहीर होताच, बंगळुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष पहायला मिळत आहे. पक्षाचा झेंडा फडकावत घोषणाबाजी केली जात आहे. एकीकडे असा जल्लोष असताना मात्र ‘महाराष्ट्र एकीकरण समिती‘चा यंदाच्या निवडणुकीतला पराभव निश्चित मानला जात होता. त्यांचा 2018 प्रमाणे याही निवडणुकीत पाणीपत होणार की काय असा सवला आता पडला आहे. कारण अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सीमाभागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्णपणे निराश झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एकही समितीचा एकही उमेदवार आघाडीवर आलेला दिसत नाही, तर बेळगाव जिल्ह्यातील 18 मधील 13 मतदारसंघावर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. निपाणी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे एकंदरीतच बेळगावसह सिमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीची पिच्छेहाट होताना दिसत आहे. त्यांचा आवाज हा विधीमंडळात पोहताना दिसत नाही.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

