AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांची पत्रकार परिषदेला दांडी पण.... जयंतरावांनी स्पष्टच सांगितलं कारण, म्हणाले...

अजितदादांची पत्रकार परिषदेला दांडी पण…. जयंतरावांनी स्पष्टच सांगितलं कारण, म्हणाले…

| Updated on: May 07, 2023 | 8:18 AM
Share

या नाराजी नाट्यावर पडदा टाकत अखेर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत याचा खुलासा केला. मात्र त्याला अजित पवार उपस्थित नव्हते. त्यावरूनही ते नाराज असल्याच्याच चर्चा सुरू झाल्या. त्यावरून अनेक तर्क लावले जात होते.

निपाणी : कर्नाटक निवडणुकांच्या (Karnataka Election) प्रचाराचा धुरळा उडत असतानाच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू होतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा (Sharad Pawar Resignation) दिला आणि एकच खळबळ उडाली. तर हे करण्यामागे अजित पवार कारण असल्याचे सांगितले जाऊ लागले. या नाराजी नाट्यावर पडदा टाकत अखेर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत याचा खुलासा केला. मात्र त्याला अजित पवार उपस्थित नव्हते. त्यावरूनही ते नाराज असल्याच्याच चर्चा सुरू झाल्या. त्यावरून अनेक तर्क लावले जात होते. त्यावर स्वत: अजित पवार (Ajit Pawar) पत्रकार परिषदेला नसले तरी आमचे बाकीचे सहकारी उपस्थित आहेत. सहसा पत्रकार परिषदेला नेतृत्वाची संपूर्ण फळी कधी बसत नाही. त्यामुळे उपस्थितांच्या मनात पाल आणखीन जोरात चुकचूकली. यावर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी खुलासा केला आहे. त्यांनी, पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला निमंत्रण केलं गेलं. तर अजित दादा हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी किंवा त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी वेगळ्या ठिकाणी गेलेले असतील त्यामुळे ते उपस्थित नव्हते. मी, शरद पवार, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे उपस्थित होतो आणि बाकीचे उपस्थित होते.

Published on: May 07, 2023 08:18 AM