Karuna Sharma : शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी करुणा शर्मांचा मुंडेंवर गंभीर आरोप, थेट पुरावा दाखवत म्हणाल्या…
देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती करते, गृहमंत्री पदाची लाज ठेवायची असेल तर देशांमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले तसेच ऑपरेशन हे बीडमध्ये सुद्धा राबवा.
बीड जिल्ह्यातील परळीच्या टोकवाडी परिसरात लिंबोटा येथील रहिवासी असलेल्या शिवराज दिवटे याला दोन दिवसापूर्वी अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ७ आरोपीला अटक केल्याची माहिती मिळतेय. बीडध्ये एकामागून एक अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने बीडमध्ये तणावपूर्ण वातावरण कायम आहे. अशातच या घटनेवर करूणा शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘बीडमध्ये धनंजय मुंडेंची लोकं बीड जिल्ह्यात मारहाण करत आहे. ज्या मुलाकडून मारहाण करण्यात येतेय. त्याचं वय १८ वर्ष आहे. या मुलाचे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे याच्यासोबत फोटो आहे.’, असे म्हणत असताना करूणा शर्मानी थेट फोटो पुरावे म्हणून दाखवले. इतकंच नाहीतर शिवराज दिवटे यांला झालेल्या मारहाणीच्या घटनेत धनंजय मुंडे यांच्याच गुंडांचा हात असल्याचा खळबळजनक आरोपही करूणा शर्मा यांनी केला.