Karuna Sharma : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची हकालपट्टी करा, लवकरच आंदोलन छेडणार असल्याची करुणा शर्मांची माहिती
Karuna Sharma News Update : महिलांवर अत्याचार करणाऱ्या सर्व मंत्र्यांना काढून टाकावं अशी मागणी करुणा शर्मा यांनी आज टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना केली आहे. याबद्दल आपण लवकरच मोठं आंदोलन छेडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या सर्व मंत्र्यांना काढून टाकावं अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे. यासंदर्भात आपण लवकरच आंदोलन छेडणार असल्याचं देखील करुणा शर्मा यांनी आज टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हंटलं.
पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, मंत्री जयकुमार गोरे यांचं प्रकरण आता बाहेर आलेलं आहे. मधुकरराव पिचड यांची सून देखील माझ्याकडे आली होती. त्यांच्यावर खूप अत्याचार झाला असल्याचं त्यांनी मला सांगितलं. सगळ्या पक्षाचे असे अनेक मंत्री, आमदार आणि खासदार आहेत, ज्यांनी महिलांवर अत्याचार केला आहे, त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करून त्यांची आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद रद्द करावं अशी माझी मागणी आहे. आज राज्यापासून केंद्रात त्यांचं सरकार आहे. महिलांवरील अत्याचार थांबवायला त्यांनी या मंत्र्यांवर कारवाई करावी यासाठी मी या सर्व पीडित महिलांना घेऊन त्यांना मागणी करणार आहे, असंही करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

