KEM Hospital | केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्तांच्या विधानाने चर्चेला उधाण!
मुंबईतील ऐतिहासिक केईएम (KEM) रुग्णालयाचे नाव बदलून 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' करण्याची मागणी बर्याच काळापासून केली जात होती. या रुग्णालयाचे नाव किंग एडवर्ड मेमोरियल असल्यामुळे अनेकांनी आक्षेप दर्शवला होता.
मुंबईतील ऐतिहासिक केईएम (KEM) रुग्णालयाचे नाव बदलून ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करण्याची मागणी बर्याच काळापासून केली जात होती. या रुग्णालयाचे नाव किंग एडवर्ड मेमोरियल असल्यामुळे अनेकांनी आक्षेप दर्शवला होता. मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भातील प्रस्ताव आरोग्य समितीला पाठवला होता.
नावात बदल करण्याचा प्रस्ताव आरोग्य समितीने मंजूर केला असून, तो आता पालिका प्रशासनाकडे पाठवला आहे. या वेळी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘समितीने जो निर्णय घेतला आहे तो कायम राहील’.
अश्विनी भिडे यांच्या प्रतिक्रियेवरुन केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवला जाण्याची शक्यता दाट झाली आहे.
Published on: Apr 28, 2026 04:15 PM
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....

