Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satish Bhosale Video : 'खोक्या' पूर्ण फसला, सतीश भोसले प्रयागराजमध्ये 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार

Satish Bhosale Video : ‘खोक्या’ पूर्ण फसला, सतीश भोसले प्रयागराजमध्ये ‘पॅक’, थेट विमानानं मुंबईत आणणार

| Updated on: Mar 13, 2025 | 10:32 AM

मारहाण आणि हरिणांच्या शिकारीच्या आरोपांवरून गुन्हा दाखल झालेल्या खोक्याला अखेर अटक झाली. काही दिवसांपासून खोक्या भोसले पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याचा मुसक्या प्रयागराजमध्ये आवळण्यात आल्या.

खोक्या उर्फ सतीश भोसलेला बीड पोलिसांनी यूपीच्या प्रयागराजमध्ये बेड्या ठोकल्या. मारहाण आणि हरिणांच्या शिकारीच्या आरोपातील गुन्हा दाखल होऊनही खोक्या भोसले फरार होता. टीव्ही नाईनने खोक्याला गाठलं होतं, पण तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर प्रयागराजमध्ये खोक्याला पोलिसांनी पॅक केले आहे. गेल्या १० तारखेला सोमवारी खोक्याने टीव्ही नाईनला अहिल्यानगरच्या बॉर्डरवरून मुलाखत दिली. मुलाखत देवून खोक्या भोसले संभाजीनगरमध्ये आला. ११ तारखेला खोक्या नाव बदलून संभाजीनगरच्या हॉटेलमध्ये राहिला. त्याच दिवशी तो प्रयागराजच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली. बीड पोलीस लोकेशन ट्रेस करत होते अखेर प्रयागराजमध्ये यूपी पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली.

प्रयागराजहून खोक्या भोसलेला विमानाने मुंबईत आणि त्यानंतर बाय रोड त्याला बीडमध्ये आणलं जाणार आहे. खोक्या आपलाच कार्यकर्ता असल्याचं सुरेश धस म्हणाले होते. आता त्याला अटक केल्यानंतर चांगली गोष्ट असल्याचं म्हणत धसांनी कारवाई होणार असल्याचं म्हटलंय. खोक्या भोसलेवर पंधरा दिवसात शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये तिसरा गुन्हा दाखल झालाय. आठ मार्चला सतीश भोसलेच्या घरी वनविभागाने छापा टाकला होता, ज्यात 600 ग्रॅम गांजा आढळला. या गांजाची किंमत 7200 रुपये आहे. गांजा बाळगल्या प्रकरणी खोक्या भोसलेवर गुन्हा दाखल झाला. खोक्या घरी प्रतिबंधित अशा प्राण्यांचे मांस आढळल्याने गुन्ह्याची नोंद झाली आहे. ढाकणे पितापुत्राला मारहाण प्रकरणात खोक्यावर गुन्ह्याची नोंद झाली. तसेच खोक्या भोसलेने जिथे घर बांधले आहे ती जागा वनविभागाची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याच्या प्रकरणातही गुन्हा दाखल झाला.

Published on: Mar 13, 2025 10:32 AM