Satish Bhosle : ‘बॉम्ब, हत्यारं घरात टाकून आणि…’, खोक्याला आधी मारहाण अन् आता धमकी, वकिलांकडून मोठी माहिती समोर
खोक्या भोसलेला वनअधिकाऱ्याकडून धमकी देण्यात आल्याचे वकील अंकुश कांबळे यांच्याकडून सांगितले जात आहे. नुकतीच सतीश भोसले याला वनविभागाच्या कोठडीत मारहाण करण्यात आली होती.
बीड जिल्ह्यात वनविभागाच्या कोठडीत खोक्या उर्फ सतीश भोसले याला मारहाण करण्यात आल्याची माहिती काल समोर आली होती. वनविभागाच्या कोठडीत खोक्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा वकिलांनी केला होता. तर खोक्या भोसले याच्या अंगावर वळ उठल्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते. त्यानंतर आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. बॉम्ब, हत्यारं घरात टाकून नक्षलवादी असल्याचे दाखवू अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप वकील अंकुश कांबळे यांनी केला आहे. तर वनअधिकारी कुणाच्या तरी सांगण्यावरून कटकारस्थान करत आहे, असं म्हणत वकिलांकडून हा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तर वनअधिकारी अमोल गरकळकडून खोक्या भोसलेला मारहाण करण्यात आल्याचे देखील वकिलांनी सांगितले आहे. ‘सतीश भोसले उर्फ खोक्याला एक वनअधिकारी मारहणा करतो. त्या अधिकाऱ्यावर कुणाचं प्रेशर आहे. मी गडचिरोलीला राहिलोय. तिकडच्या बंदूका, बॉम्ब तुझ्या घरात ठेवेल आणि तू नक्षलवादी आहे असं दाखवेल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची वाट लावून टाकेल.’, अशी वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

