Special Report | कोल्हापूरवरून नवा कल्ला, किरीट सोमय्यांचा सीएसएमटी स्टेशनवर हायव्होल्टेज ड्रामा

मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर सोमय्या पोहोचल्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम होते.

भाजप नेते किरीट सोमय्या अखेर कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बसले आहेत. मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर सोमय्या पोहोचल्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सोमय्या यांची समजूत काढण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. पण सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम होते. अखेर पोलिसांनीच त्यांना कोल्हापूरला जाण्यास परवानगी देत महालक्ष्मी एक्सप्रेपर्यंत आणून सोडलं. त्यानंतर सोमय्या गाडीत बसले. यावेळी सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा निशाणा साधला. (Kirit Somaiya’s high voltage drama at CSMT station)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI