Kolhapur Tabkadi Found | पन्हाळ्यात अवकाशात दिसली तबकडी सदृश्य वस्तू
आता ही वस्तू पाहून हे काय दिसतंय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पन्हाळा येथील रमेश पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्ये याचं शूटिंग केलं, अतिशय मंद गतीने तबकडी सारखी ही वस्तू उत्तरेच्या दिशेला सरकत होती, असेही त्यांनी सांगितलं.
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) म्हटलं कुठल्याच गोष्टीला कमी नसेत, मग त्या कोल्हापूरच्या तालमी असो, तांबडा पांढरा असो, किंवा ऊसाच्या फडापासून तमाशाच्या फडापर्यंत काहीही असो, मात्र याच कोल्हापुरात एलियन (Aliens) उतरत आहेत की काय असाच भास कोल्हापूरकरांना काही काळ झाला. त्याला कारणही तसेच ठरले, आकाशात अचानक एक अशी वस्तू दिसली. त्यामुळे अनेकांना एलियनचे अनेक चित्रपट डोळ्यासमोर उभे राहिले. कोल्हापुरात काल आकाशात तबकडी सदृष्य वस्तू दिसल्याने ही वस्तू नेमकी काय याची बरीच चर्चाही रंगली. पांढर्या शुभ्र रंगाची तबकडी (Tabakdi) सारखी वस्तू दिसल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झालं. पन्हाळगडाच्या पश्चिमेकडून हळूहळू ही वस्तू उत्तरेच्या दिशेने सरकली. आणि हे नेमकं काय याचा सस्पेन्स आणखी वाढला.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

