Kolkata Rape Case Big Breaking : अखेर कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय, नराधमाला जन्मठेप अन्...

Kolkata Rape Case Big Breaking : अखेर कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय, नराधमाला जन्मठेप अन्…

| Updated on: Jan 20, 2025 | 5:57 PM

कोलकाता आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरची बलात्कारातून हत्येचा प्रकार. या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला शनिवारी कोर्टाने दोषी ठरविले होते मात्र आज आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथील एका महिला ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करण्यात येऊन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. आरोपी संजय रॉयला जन्मठेपेच्या शिक्षेसह पीडित कुटुंबाला १७ लाख रूपयांची भरपाई देण्याचे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले आहे. गेल्या ९ ऑगस्ट २०२४ रोजी आरजी कर मेडिकल कॉलेजच्या छाती विकारतज्ज्ञ विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये ट्रेनी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. महिला डॉक्टरच्या मृतदेहावर अनेक गंभीर जखमाच्या खुणा होत्या. या प्रकरणात पाच महिन्यात आरोपपत्र दाखल होऊन मुख्य आरोपीला संजय रॉय या वैद्यकीय स्वयंसेवकाला अटक झाली होती. या प्रकरणात बीएनएस धारा ६४,६६, १०३/१ च्या कलमांतर्गत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. १३ ऑगस्ट २०२४ रोजी कोलकाता पोलीसांकडून या प्रकरणाचा तपास काढून सीबीआयच्या ताब्यात सोपविण्याचा आदेश कोलकाता हायकोर्टाने दिला होता. दरम्यान, अनेक तपासानंतर आज सोमवारी या प्रकरणात आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Published on: Jan 20, 2025 05:57 PM