रस्त्यात खड्डे अन् खड्ड्यात बर्थडे ! खड्ड्यात वृक्षारोपण करून केक भरवला, कुठं झालं अनोखं सेलिब्रेशन?
VIDEO | खड्ड्यात बसून वाढदिवसाचं अनोखं सेलिब्रेशन तुम्ही पाहिलं का? भंडारा ते तुमसर राष्ट्रीय महामार्गवरील खड्ड्यात वृक्षारोपण करून केक भरवला अन् अभिनव आंदोलनानं प्रशासनाची उडाली झोप
भंडारा, २८ ऑगस्ट २०२३ | सध्या वाढदिवस सेलिब्रेशन आगळ्या-वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचं फॅड आहे. यात मित्रांसोबत मोठमोठ्या हॉटेलमध्ये जल्लोषात सेलिब्रेशन करताना बघायला मिळतं. मात्र, भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील कृष्णा भुजबळ या तरुणानं त्याचा वाढदिवस भंडारा ते बालाघाट आंतरराज्य महामार्गावरील वरठी ते दाभा या गावादरम्यान पडलेल्या खड्ड्यात बसून कृष्णा व त्याच्या मित्रांनी वाढदिवस साजरा केला. यावेळी ऑटो रिक्षा युनियननं त्यांना साथ देत खड्ड्यांमध्ये रोपटे लावून शासन आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या सत्कार करून करून प्रत्येक खड्डय्यांना केक भरवत वाढदिवस साजरा केला. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा झालेले असून अनेकांना प्राणही गमवावे लागले आहे. या अभिनव वाढदिवसाची आता जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

