Viral Girl Mona Lisa Video : काजळ डोळे, कुरळे केस अन् भेदक नजर… कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
महाकुंभ मेळ्यातून आपल्या रुपामुळे प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला सध्या त्याच प्रसिद्धीचा त्रास होऊ लागलाय. लोकांच्या गर्दीमुळे तिला व्यवसाय करणेही जिकिरीचं होऊन बसल्याचे पाहायला मिळाले आहे.
काजळ डोळे, कुरळे केस आणि प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात रुद्राक्ष माळा विकणारी ही तरुणी एका फोटोन देशभर व्हायरल झाली. तिच्या सौंदर्याच्या आणि साधेपणाच्या चर्चा सुरू झाल्या. सुंदर हास्य आणि भेदक डोळ्यांच्या मोनालिसाला पाहण्यासाठी कुंभमेळ्यात गर्दी उसळू लागली. माहितीनुसार तरुणीचे नाव मोनालिसा असून ती मध्यप्रदेशातल्या खारगोन मधल्या महेश्वरीची राहणारी आहे. दुर्गम भागातून तिचा परिवार ३५ ते ४० वर्ष रुद्राक्ष माळा विकण्याचा व्यवसाय करतो. यंदा कुटुंबासह ती मेळ्यात आली आणि संपूर्ण देशात तिच्या सौंदर्याची चर्चा सुरू झाली. मात्र याच प्रसिद्धीपायी मोनालिसाला महाकुंभ मेळ्यात व्यवसाय करणे जिकिरीच झाले आहे. अनेक लोक सोबत फोटो काढण्यासाठी आणि इंटरव्ह्यूसाठी पोहोचत असल्याने त्यांना व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. मोनालिसाची तब्येत खराब होऊ शकते हे लक्षात घेऊन तिच्या कुटुंबाने कुंभ मेळा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांच्या जाचापायी मोनालिसा आणि तिच्या कुटुंबान कुंभमेळा सोडल्याची चर्चाही रंगली. मात्र तिच्या कुटुंबान अशा बातम्या फेटाळल्यात. पण लोकांचा त्रास होत असल्याच त्यांनी सांगितले आहे. तर हर्षा नावाची एक महिला साध्वीच्या रूपात कुंभमेळ्यात पोहोचली होती. तिलाही तिच्या रूपानेच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र ही महिला संन्यासी नसून साध्वीच्या रूपात पोहचल्याने तिच्यावर टीका सुरू झाली. अखेर तिला कुंभमेळा सोडावा लागला. तशीच वेळ आता मोनालिसावर आली आहे. ज्या सौंदर्य आणि साधेपणामुळे प्रसिद्धी मिळाली तीच प्रसिद्धी त्यांच्या व्यवसायासाठी डोकेदुखी होऊन बसली आहे.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली

ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..

'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला

'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
