Guardian Ministership : महायुतीत ‘या’ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली. मात्र रायगड वरून शिंदे यांची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीत खटके उडतायत. भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी तर शक्ती प्रदर्शन केलेलं.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये धुसफूस निर्माण झाली. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिंदे यांचे मंत्री भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि हे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर धडकले. हे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्ताईगिरी बंगल्यावर धडकले. रायगडच पालकमंत्री पद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे आणि नाशिकचा पालकमंत्री पद गिरीश महाजनांना मिळाल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेने आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी स्थगितीचे आदेश दिले. आता रायगडच पालकमंत्री पद भरत शेठ यांनाच मिळावं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी शक्ती प्रदर्शन केलं. दरम्यान, गोगावले यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर टायर जाळत आंदोलनही केलं. स्वतः एकनाथ शिंदे यांनी गोगावले यांच्या मागणीचे समर्थन केलं. शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरावे आणि महेंद्र दळवींनी तर तटकरे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे यांनी यापुढे टीका खपवून घेणार नाही अशा शब्दात इशारा दिलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली

ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..

'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला

'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
