पालकमंत्रीपद वाटपावरून शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत धुसफूस, अजितदादा गटातील मंत्री नाराज
स्वजिल्हा न मिळाल्याने माणिकराव कोकाटे यांना सावल केला असता ते म्हणाले, काय झालं, काय घटना घडली आम्ही शिर्डीत होतो. काही ठिकाणी इकडे तिकडे झालेले मुख्यमंत्री निर्णय घेतील. मला काहीही मिळालं तरी चालेल, असं माणिकराव कोकाटेंनी वक्तव्य केलं आहे.
शिंदेंच्या शिवसेनेनंतर आता पालकमंत्रीपदावरून अजितदादांचे मंत्री नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्रीपद वाटपावरून शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही धुसफूस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. स्वजिल्हे न देता काही मंत्र्यांना दूरचे जिल्हे देण्यात आले तर राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजप शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिकचे स्वजिल्हे दिल्याने नाराजी असल्याची माहिती मिळतेय. पालकमंत्रीपद वाटपावरून शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही धुसफूस सुरूच असल्याची चर्चा होतेय. स्वजिल्हे न देता काही मंत्र्यांना दूरचे जिल्हे देण्यात आलेत. राष्ट्रवादीच्या दहा पैकी केवळ अजित दादांनाच स्वजिल्हा देण्यात आला. राष्ट्रवादीच्या तुलनेमध्ये भाजपच्या मंत्र्यांना अधिकचे स्वजिल्हे देण्यात आलेत. भाजपच्या २० पैकी सात आणि शिवसेनेच्या १२ पैकी सात मंत्र्यांना स्वजिल्ह्याच पालकमंत्रीपद देण्यात आलंय. तर राष्ट्रवादीच्या दहा पैकी केवळ दादांनाच स्वजिल्हा मिळालाय. दुसरीकडे हसन मुश्रीफ, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांना त्यांच्यापासून लांब असलेल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय. स्वजिल्हे न मिळाल्याने काही मंत्र्यांनी अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली

ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..

'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला

'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
