Eknath Shinde Video : एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर
पालकमंत्रीपदावरून शिंदे गटाची राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त झाली आहे. रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना मिळाल्याने भाजपचे आमदार भरत गोगावले नाराज आहेत. त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केले. अशातच शिंदे नाराज असल्याचेही समोर आले होते.
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून तर भरत गोगावले यांना एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त केल्याने आणि एसटी बसेसची खरेदी निविदा रद्द केल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेचे गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आलं नसल्याने पालकमंत्रीपदावरूनच त्यांचा पत्ता कट झाला आहे. गोगावलेंसह मंत्री दादा भूसे यांनाही पालकमंत्रीपद मिळाले नाहीये. त्यामुळे नाराज एकनाथ शिंदे दरेगावी गेल्याची चर्चा होती. तर याआधी विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे अडून बसल्याची चर्चा होती. एका आठवड्यानंतर शिंदेनी फडणवीसांचा मार्ग मोकळा केला. शपथविधी नंतर खाते वाटपावरूनही शिंदे नाराज असल्याच्या बातम्या आल्याचे पाहायला मिळाले होते.

पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...

कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय

तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली

एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
