Kunal Kamara : अजितदादांनी 2024 ची निवडणूक ‘गद्दार’वर लढवली मग त्यांच्यावर… कामराच्या वकिलांचा थेट कोर्टात सवाल
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कॉमेडियन कुणाल कामरा याने विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून कामराविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. ही एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी पार पडली.
कॉमेडियन कुणाल कामरा याच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. मुरजी पटेल, गुलाबराव पाटील, राहुल कनाल यांनी कुणाल कामराला धमकी वजा इशारा दिला असल्याची माहिती कामराच्या वकिलांनी कोर्टात दिली. शिवसेना पक्षात जे घडलं त्याची इतिहासामध्ये नोंद झाली. कामरानं फक्त आपलं मत मांडलं, असं युक्तिवादादरम्यान कामराच्या वकिलांनी म्हटलंय. यावेळी आधी हॉटेलमध्ये तोडफोड मग पालिकेची कारवाई हे चुकीचं आहे, असं म्हणत कामराचे तुकडे करू, अशा धमक्यांचे स्क्रीनशॉट्स वकिलांनी कोर्टामध्ये दाखवले आहेत. जीवाला धोका असल्यामुळेच आम्हाला अंतरिम जामीन द्या, असा युक्तिवाद कामराच्या वकिलांनी केलाय. तर अजित पवारही शिंदेंच्या शिवसेनेला गद्दार म्हणाले होते. २०२४ ची संपूर्ण निवडणूक गद्दार या शब्दावर लढवली गेली, मग त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही? असा सवाल करत असा कामराच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

