Indryani Bridge Collapse : कुंडमळा पूल दुर्घटना; 6 वर्षांच्या चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू, शोधमोहीम सुरूच
Pune Indryani Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. वन्यजीव संस्थेकडून अद्यापही शोध मोहीम सुरूच आहे.
पुण्यातल्या मावळमधल्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना काल दुपारी घडल्यानंतर यात वाहून गेलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आलेलं होतं. हे बचावकार्य अद्यापही सुरू आहे. हा दुर्घटनेत चौघांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. यातील 3 मृतदेहांची ओळख पटलेली आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये 6 वर्षांच्या एका चिमुकल्याचाही समावेश आहे. तर या दुर्घटनेत 51 जण जखमी झालेले आहेत.
आज वन्यजीव संस्थेकडून या कुंडमळा भागातील खालच्या बाजूला शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ड्रॉनच्या सहाय्याने तसंच बोटीतून तपास करून वाहून गेलेल्या नागरिकांपैकी कोणी अडकून पडलेलं आहे का याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर करण्यात आलेली आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर

शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...

पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर

आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्..
