Indrayani River Bridge Collapse : कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
Indrayani River Bridge Collapse Updates : इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळल्यानंतर आजच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.
पुण्याच्या मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळल्याने काल जी दुर्घटना घडली, त्यानंतरची या परिसरतली दृश्य आता समोर आलेली आहे. कुंडमळा ओलांडण्यासाठी हा एकमेव पूल या ठिकाणी होता. तोच मधोमध खचल्याने ही दुर्घटना झाली आहे. याठिकाणी अनेक कुंड आहेत, खडकाळ परिसर आहे. आज ड्रॉनच्या माध्यमातून या परिसरतली दृश्य टिपण्यात आलेली आहे.
कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना काल घडली. यात जवळपास 30 ते 35 पर्यटक वाहून गेले. परवानगी नसताना या पुलावर दुचाकी वाहन आणल्याने हा पूल तुटल्याचं सांगितलं जात आहे. काल रविवार असल्याने याठिकाणी अनेक पर्यटकांनी गर्दी केलेली होती. यात 4 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर 51 पर्यटक जखमी झाले आहेत. दरम्यान, आता हा पूल तुटल्यानंतर कुंडमळा ओलांडण्यासाठी मात्र कोणताही पर्यायी मार्ग उरलेला नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.