Mumbai | गोराईतील आधारिका भवन लसीकरण केंद्रावर लसींचा तुटवडा, नागरिकांमध्ये नाराजी

गोराईतील आधारिका भवन लसीकरण केंद्रावर लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. लास घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

गोराईतील आधारिका भवन लसीकरण केंद्रावर लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. लास घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. केंद्राने नव्या फेरबदलात आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना बदलले व मनसुख मांडविया यांना आणले. पण लस तुटवडय़ाचा गोंधळ सुरूच आहे. केंद्रशासित लडाखसारख्या प्रदेशात 100 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला, पण दुसऱ्या ‘डोस’चा गोंधळ सर्वच स्तरावर सुरू आहे. केंद्राचे म्हणणे आहे की, राज्यांकडे साधारण दीड कोटीपेक्षा जास्त ‘डोस’ उपलब्ध आहेत. पण महाराष्ट्रात लसीचा तुटवडा स्पष्ट दिसत आहे. मधून मधून लसीकरणास ब्रेक लागत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI