Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ बंद होणार? दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात सर्वाधिक बोगस ‘लाडक्या’, सवाल केला तर दादा म्हणाले…
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात राज्यातल्या सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी निघाल्याचं समोर आलं. यावर निवडणूक काळात विरोधकांनी बोगस लाडक्या बहिणींच्या नोंदी केल्याचा दावा भाजप प्रवक्त्यांनी केलेला आहे. तर भुजबळ यांनी मंत्र निवडणुकीवेळी घाई होती म्हणून दुर्लक्ष झाल्याची कबुली दिली आहे.
अपात्र महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेऊ नका असं म्हणणाऱ्या अजित पवारांच्याच पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी निघाल्यात. विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात बोगस लाडक्या बहिणींचा प्रमाण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आढळले. दोन्ही नेत्यांच्याच जिल्ह्यात बोगस लाडक्या बहिणींचा आकडा जवळपास सव्वा तीन लाखांच्या पुढे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ४ हजार बोगस लाडक्या बहिणी आढळल्यात. त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यात १ लाख २५ हजार ३०० महिलांनी लाडकी बहिण योजनेचा बेकायदेशीर रित्या लाभ घेतल्याचे समोर आले.
यानंतर भाजपचे मंत्री विखे पाटील यांच्या नगर या जिल्ह्यात १ लाख २५ हजार ७५६, भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यात १ लाख ८६ हजार ८००, संभाजीनगरात १ लाख ४ हजार ७०० तर कोल्हापुरात १ लाख १४००, मुंबई उपनगरात १ लाख १३ हजार, सोलापुरात १ लाख ४ हजार, नागपुरात ९५ हजार ५००, नांदेडमध्ये ९२ हजार तर सांगलीत ९० हजार यासह सातारातही ८६ हजार, धुळ्यात ७५ हजार, जालन्यात ७३ हजार, पालघर मध्ये ७२ हजार, बीडमध्ये ७१ हजार तर लातूर मध्ये ६९ हजार यासह अमरावतीत ६१ हजार बोगस लाडक्या बहिणी आढळल्या.आजच्या तारखेपर्यंत २६ लाख ३४ हजार बोगस लाभार्थ्यांनी लाडकी बहिण योजनेत दरमहा १५०० रुपये घेतल्याचे समोर आलंय भविष्यात हा आकडा अजून वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी योजनेत कशा शिरल्या असा प्रश्न विचारल्यानंतर योजना आता बंद करू का असा प्रति प्रश्न अजित पवारच विचारत आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

