AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : पैशांची बंडलं, आकड्यांच्या चिठ्ठ्यांचा गठ्ठा... सिने स्टाईल नितेश राणेंची एन्ट्री अन् जुगार मटक्याच्या अड्ड्यावर धाड, पोलिसांनाही धरलं धारेवर

Nitesh Rane : पैशांची बंडलं, आकड्यांच्या चिठ्ठ्यांचा गठ्ठा… सिने स्टाईल नितेश राणेंची एन्ट्री अन् जुगार मटक्याच्या अड्ड्यावर धाड, पोलिसांनाही धरलं धारेवर

| Updated on: Aug 23, 2025 | 4:30 PM
Share

मंत्री नितेश राणेंना एरवी भाषणांमधून किंवा हिंदू मोर्चांमधून आक्रमक झाल्याचं पाहिले आहे. पण काल त्यांनी कणकवलीमध्ये थेट मटका अड्ड्यावर धाड टाकली आणि पोलिसांना दमही दिला. पण पुढच्या दोनच तासात आरोपी सुटले.

मंत्री नितेश राणेंनी थेट कणकवलीमधल्या मटका अड्ड्यावर धाड टाकली. चार महिन्यांआधी पोलिसांना सांगूनसुद्धा मटका बुकी महादेव घेवारी याचा अड्डा सुरु होता. नितेश राणेंनी धाड टाकली. त्यावेळेला मंत्री नितेश राणे आल्याचं पाहून मटका चालवणाऱ्यांची पळापळी झाली. धाड पडताच घेवारीचा मटका अड्डा उघडा पडला.

टेबलावर पैशाची बंडलं आणि मटक्याच्या आकड्यांच्या चिठ्ठ्यांचा गठ्ठा सुद्धा सापडला. इतकंच काय इथली गादी, पॅन्ट आणि शर्टमध्ये सुद्धा पैसे सापडले धक्कादयक म्हणजे अवघ्या दोन तासातच या आरोपींना टेबल जामीन सुद्धा मिळाला. दरम्यान, आरोपी दोन तासातच सुटल्यामुळे नितेश राणेंनी आणखी संताप व्यक्त केला. मटकावाल्यांना वाचवलं तर सोडणार नाही असा इशारा नितेश राणेंनी पोलिसांना दिला. पोलिसांना सांगूनसुद्धा मटक्याचे अड्डे बंद होत नाहीत. उलट पोलिसांनी एक लाखाऐवजी दोन लाख हप्ता केला असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 23, 2025 04:29 PM