लालबागच्या राजाच्या मंडपात भाविकांना धक्काबुक्की! पाहा व्हिडीओ, महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सिद्धेश सावंत

Updated on: Aug 31, 2022 | 6:25 PM

Lalbaugcha Raja : महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे. एक महिला सुरक्षा रक्षकांवर प्रचंड संतापलेली असल्याचं दिसून आलंय. या महिलेनं सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्कीदेखील केली.

मुंबई : भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वाद झाल्याची घटना लालबागचा राजा (Lalbaug cha Raja) सार्वजनिक गणेसोत्सव मंडळात घडली. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाल्याचं व्हिडीओमध्ये (Lalbaugcha Raja Video) दिसून आलं आहे. एक महिला सुरक्षा रक्षकांवर प्रचंड संतापलेली असल्याचं दिसून आलंय. या महिलेनं सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्कीदेखील केली. पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षकांच्यासोबत महिलेनं बातचीत केली. यावेळी जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी या महिलेची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. मुखदर्शनाच्या रांगेतून जात असतााना लालबागच्या राजाच्या मंडपात भाविकांना धक्काबुक्की झाली. लालबागच्या राजा हा मुंबईच्या प्रसिद्ध सार्वजनिक गणपती मंडळांपैकी एक. दरवर्षी अनेक सेलिब्रिटींप्रमाणे सर्वसामान्य लोकंही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जात असतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता चोख नियोजन ठेवण्याचा प्रयत्न लालबागचा राजा मंडळाकडून केला जातो. पण दरवर्षी घडणाऱ्या अप्रिय घटनांमुळे लालबागचा राजा मंडळही गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आलं आहे. आता गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशीदेखील अशीच अप्रिय घटना समोर आल्यानं भाविकांमध्येही संतापाची लाट उसळलीय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI