झोपेतच काळाने घात केला, खालापूरच्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली!
जोरदार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खालापुरच्या इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे.या दरडीखाली 200 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.ही घटना घडताच एनडीआरएफची टीमही घटनास्थळी धाव घेतली.
खालापूर | 20 जुलै 2023 : गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी भरल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाने रायगड जिल्ह्यालाही झोडपून टाकले. खालापुरच्या इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे.या दरडीखाली 200 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना घडताच एनडीआरएफची टीमही घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत रात्रीच घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर अधिक माहितीसाठी प्रशासनाकडून 8108195554 हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

