Gajanan VadaPav Video : डोंबिवलीकरांनो… तुम्ही पण हा प्रसिद्ध वडापाव खाताय! चटणीत निघाल्या अळ्याच अळ्या अन्…
खवय्यांच्या गर्दीने नेहमी गजबजलेल्या डोंबिवली पश्चिम भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार समोर आला आहे. येथील प्रसिद्ध ‘गजानन वडापाव’ विक्रेत्याच्या चटणीत चक्क अळ्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नेहमीप्रमाणे, स्थानिक भाजी विक्रेत्या महिलांनी पोटपूजा करण्यासाठी या प्रसिद्ध दुकानातून वडापाव खरेदी केला. वडापाव खात असताना, त्यामधील चटणी नीट पाहिल्यानंतर त्यांना त्यात हालचाल करणाऱ्या अळ्या दिसल्या! हा प्रकार पाहून भाजी विक्रेत्या महिला ग्राहकांनी तात्काळ हा वडापाव टाकून देत, दुकानात गोंधळ घातला या संतापजनक घटनेची माहिती परिसरात दिली.
यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या समाजसेविका काशीबाई जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. त्यांनी जराही वेळ न घालवता, त्वरित ही बाब कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे ‘ह’ प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली.राजेश सावंत यांनीही कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता, तात्काळ या स्थळाची पाहणी केली. पाहणीत प्रकार सत्य असल्याचे लक्षात येताच, त्यांनी अन्या व आरोग्य विभागाला सूचित करून संबंधित ‘गजानन वडापाव’चे दुकान त्वरित बंद करण्याचे आदेश दिले. सध्या अन्या व आरोग्य विभाकडून संबंधित खाद्यांचा सॅम्पल नेततपासणी करण्यात येत आहे या तपासणी नंतर योग्य करवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सागितले
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

