मान्सूनपूर्व पावसानं पपई बागांना झोडपलं, कुठं झालं बळीराजाचं मोठं नुकसान?
VIDEO | वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पपई बागांचं कुठं झालं मोठं नुकसान?
लातूर : गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं होतं. आता मान्सून पूर्व पावसाची हजेरी काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. वादळी पावसाने लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात फळ बागांचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या शिवली इथं पपई बागांचं नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शाश्वत पाण्याचा सोर्स नसतानाही हे शेतकरी पपई लागवडीतून दरवर्षीं लाखोंचं उत्पादन घेतात, मात्र तीन दिवसापूर्वी अचानक आलेल्या वादळी पावसाने पपई झाडांचं नुकसान झाले आहे . काही ठिकाणी झाडे कोलमडली आहेत ,तर काही ठिकाणी पपई गळून पडली आहे . वादळी वाऱ्यासह गारांचा माराही झाल्याने पपईला कीड लागायला सुरुवात झाली आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

