‘तारीख पे तारीख तो होनेवाली है’, अजित पवारांचा सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर प्रतिक्रीया
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीला होईल अशी माहिती सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडलं गेलं आणि राज्यात सत्तांतर करण्यात भाजपला यश आलं. यानंतर भाजपने शिंदे गटाला सोबत घेत सरकार आणलं. शिंदे -फडणवीस सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) झाले आणि सत्तासंघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेलं. त्यावर आता सुनावण्या सुरू आहेत. त्याचअंतर्गत आजही सुनावणी होणार आहे. या सुनावणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडणार की सर्वोच्च न्यायालय कोणतं निर्णय देणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलं आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीला होईल अशी माहिती सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, “ तारीख पे तारीख तो होनेवाली है. तो त्यांचा अधिकार आहे. न्यायव्यवस्थेला कोणी, तुम्ही-आम्ही विचारू शकतो का? आपल्याकडे त्यांना(शिवसेनेला) जो अधिकार आहे तो अधिकार ते वापरणार. आम्हीपण बघतोय सारख्या तारखा सुरू आहेत. जवळपास सहा महिने झाले तारखा सुरू आहेत. आता पुन्हा फेब्रुवारीची तारीख दिलेली आहे.”
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...

