“भाजपने कितीही आटापिटा केला तरी…”, राऊत यांची खरमरीत टीका
ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाना साधला आहे. भाजपवर टीका करताना त्यांनी सध्या जे भाजपचं सुरू आहे ते दुर्दैवी आहे. भाजपकडे केंद्र आणि राज्य शासन असतानाही केंद्रीय मंत्र्यांना गावागावात गल्ली गल्लीत जाऊन आपलं काम सांगावं लागत आहे.
नागपूर : नोटबंदी, कर्नाटकात हार, दिल्लीत पदकवीर खेळाडूंचे सुरू असलेले आंदोलन यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाना साधला आहे. भाजपवर टीका करताना त्यांनी सध्या जे भाजपचं सुरू आहे ते दुर्दैवी आहे. भाजपकडे केंद्र आणि राज्य शासन असतानाही केंद्रीय मंत्र्यांना गावागावात गल्ली गल्लीत जाऊन आपलं काम सांगावं लागत आहे. पण लोकांना आता भाजपचा चेहरा कळला आहे. भाजपने अन्यायकारक निर्णय घेतले, कितीही अध्यादेश बदलले त्याचा फायदा होणार नाही. जे कर्नाटकात झाल ते राजस्थान, महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे आता भाजपला पराभवाची धूळ चाखावीच लागणार असल्याचं ते म्हणालेत.
Published on: May 31, 2023 11:13 AM
Latest Videos
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?

