Nashik | नांदुर्डी येथे मध्यरात्री बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथे मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास रेल्वे गेटमनला बिबट्या दिसला. यामुळे नांदुर्डी गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्य रेल्वेवर असलेल्या नांदुर्डी येथे रेल्वे गेट ओलांडून जात असताना रेल्वे गेटमनने मोठे धाडस करत या बिबट्याचा व्हिडिओ तयार केला.

नांदेड : निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथे मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास रेल्वे गेटमनला बिबट्या दिसला. यामुळे नांदुर्डी गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्य रेल्वेवर असलेल्या नांदुर्डी येथे रेल्वे गेट ओलांडून जात असताना रेल्वे गेटमनने मोठे धाडस करत या बिबट्याचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडीओ नांदुर्डीसह परिसरातील गावातील सोशल मीडियाच्या ग्रुपवर व्हायरल झाला आहे. निफाड तालुक्यात बिबट्याची मोठी संख्या असल्याने ग्रामीण भागात बिबट्यांचे नेहमीच दर्शन होते. त्यामुळे पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करत निफाड तालुका बिबटेमुक्त करावा अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI