AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Leopard Scare :  नागपूरच्या पारडी परिसरात बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यासाठी असं सुरू वनविभाग अन् पोलिसांचे रेस्क्यू ऑपरेशन

Nagpur Leopard Scare : नागपूरच्या पारडी परिसरात बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यासाठी असं सुरू वनविभाग अन् पोलिसांचे रेस्क्यू ऑपरेशन

| Updated on: Dec 10, 2025 | 10:38 AM
Share

नागपूरच्या पारडी परिसरात दुसऱ्यांदा बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. वनविभाग, पोलीस आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी बचावकार्य सुरू केले आहे. बिबट्याने ५-६ लोकांना जखमी केले असून, तो एका इमारतीच्या अडगळीत लपला आहे. नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागपूरच्या पारडी परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. यामुळे वनविभाग, पोलीस आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी हाच बिबट्या कापसी खुर्द परिसरात आढळला होता आणि त्यानंतर तो पारडीमध्ये दिसला आहे. या बिबट्याने परिसरातील ५ ते ६ लोकांना जखमी केले आहे. रेस्क्यू टीमला सुरुवातीला बिबट्याची शेपूट एका इमारतीच्या अडगळीच्या ठिकाणी दिसली. त्यानंतर संपूर्ण पथक नियोजनाने बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्याच्या प्रयत्नात आहे. पेंच वनविभागाचे नागपूर ट्रान्झिट सेंटरचे पथकही या बचावकार्यात सहभागी झाले आहे. बिबट्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर अडगळीच्या ठिकाणी लपून बसला आहे, ज्यामुळे त्याला डाट मारणे अवघड ठरत आहे.

बचाव पथकाने बिबट्याला डाट मारण्याचा पहिला प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. त्यानंतर डॉक्टरांनी दुसरा डाट लोड केला असून, बिबट्याला सुरक्षितपणे बेशुद्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन त्यांना शांतता राखण्याचे आणि घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा संपूर्ण परिसर रहिवासी असल्याने बिबट्या अधिक चिडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अत्यंत सावधगिरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने हे ऑपरेशन राबवले जात आहे.

Published on: Dec 10, 2025 10:38 AM