‘महाविकास आघाडीचं भ्रष्ट सरकार जाऊ दे’, रयत क्रांती संघटनेकडून पुण्यात आंदोलन

इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे आणि भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकार जाऊ दे, अशी घोषणाबाजी करत रयत क्रांती संघटनेतर्फे पुण्यात आंदोलन करण्यात आलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 26, 2022 | 4:15 PM

इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे आणि भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकार जाऊ दे, अशी घोषणाबाजी करत रयत क्रांती संघटनेतर्फे पुण्यात आंदोलन करण्यात आलं. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रभर हे आंदोलन करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात असंतोष असून शेतकरीदेखील भरडला जात आहे. राज्यात केवळ राजकारण सुरू आहे, जनतेच्या हिताचं काहीच होत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. म्हणून हे भ्रष्टाचारी सरकार जावो, म्हणजे इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो, महाविकास आघाडी सरकारचे, लुटारूंचे राज्य जाऊ दे, असे फलक यावेळी आंदोलकांकडून लावले गेले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें