Special Report | संजय राऊतांना कोठडी की जामीन?-tv9

राऊतांच्या वकिलांकडून जामिनाची मागणी  होईल पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊतांना 1 कोटी 6 लाखांचा थेट फायदा झाल्याचा आरोप ईडीचा आहे. तर खुद्द संजय राऊतांनी अशा कोणत्याही घोटाळ्यात हात नसून राजकीय कारवाई असल्याचं म्हटलंय.

दादासाहेब कारंडे

|

Aug 03, 2022 | 9:13 PM

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात, ईडीनं अटक केल्यानंतर राऊत 3 दिवस कोठडीत आहेत..आता ही कोठडी संपणार असून राऊतांना पुन्हा ईडीचे अधिकारी कोर्टात हजर करणार आहेत. त्यामुळं संजय राऊतांचं पुढे काय ? असा प्रश्न आहे. पुन्हा ईडी कोठडी, न्यायालयीन कोठडी की जामीन ?ईडी कोठडी संपल्यामुळं राऊतांना पुन्हा पीएमएलए कोर्टासमोर हजर केलं जाणार. ईडी राऊतांची पुन्हा कोठडी वाढवण्याची मागणी करु शकते. आणखी चौकशीची आवश्यकता आहे, हे ईडीनं पटवून दिलं तर राऊतांना पुन्हा ईडी कोठडी मिळेल किंवा मग न्यायालयीन कोठडी मिळू शकते. तर राऊतांच्या वकिलांकडून जामिनाची मागणी  होईल पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊतांना 1 कोटी 6 लाखांचा थेट फायदा झाल्याचा आरोप ईडीचा आहे. तर खुद्द संजय राऊतांनी अशा कोणत्याही घोटाळ्यात हात नसून राजकीय कारवाई असल्याचं म्हटलंय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें