Pahalgam Rally : ‘अल्लाह ने चाहा तो… ‘, दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मिरी स्थानिक रस्त्यावर, भारतीयांना घातली आर्त हाक
जे पर्यटक येतील त्यांचा पाहुणचार करायला आम्ही आजही तयार आहोत, असं पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिकांनी म्हटलंय. काश्मीरमधील अनेक भागात अद्याप शांतता पसरली आहे. मात्र दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मिरी, स्थानिक एकवटल्याने दहशतवाद्यांच्या विरोधात ते असल्याचे आजही पाहायला मिळत आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅली येथे मंगळवारी काही दहशतवाद्यांनी पर्यटकांचं हसतं-खेळतं वातावरण शांत केलं. बैसरन व्हॅली येथे अचानक दहशतवादी आले आणि पर्यटकांवर भ्याड हल्ला करत बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू गेला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. तर दुसरीकडे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पहगाममध्ये काश्मिरी लोकांसह काही स्थानिकांची रॅली काढल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी काश्मिरी लोकांसह स्थानिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. तर पर्यटकांमुळेच आमचं जीवन असल्याची भावना काश्मिरी लोकांसह स्थानिकांकडून व्यक्त केल्या जात आहे. पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत गोळीबार झाल्याच्या घटनेला दोन ते तीन दिवस उलटले तरी देखील तिथलं वातावरण हे अद्याप शांतच आहे. दुकानं देखील बंद असून स्थानिकांचा व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. त्यामुळे सगळे लोकं रस्त्यावर उतरले आहे. स्थानिक लोकांच्या मागण्या नेमक्या काय? बघा व्हिडीओ

अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन

भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही

शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
