LIVE | राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवणार, 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला तूर्तास ब्रेक :राजेश टोपे

लॉकडाऊन केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या 7 लाखांवरून 4 लाख 75 हजारवर आलीय. (Lockdown in state to be extended till May 31, Immediate break for vaccination for 18 to 44 year olds, Rajesh Tope)

मुंबई : लॉकडाऊन दरम्यान कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. लॉकडाऊन केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या 7 लाखांवरून 4 लाख 75 हजारवर आलीय. महाराष्ट्राच्या रुग्णवाढीचा दर भारताच्या रुग्णवाढीच्या दराच्या निम्मा आहे. त्यामुळे ही संख्या आणखी कमी करण्यासाठी राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची एकमताने मागणी बैठकीत झाली. याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. सीरम जेव्हा लस देईल तेव्हा 18 ते 44 गटातील नागरिकांना लस दिली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नमूद केलं.