आता सगळंच समोर आलं… लोहगडावर जाण्यापूर्वी… आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
पुण्यातील लोहगड मर्डर मिस्ट्री प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांचा आणखी एक CCTV व्हिडीओ समोर आला आहे.
पुण्यातील लोहगड मर्डर मिस्ट्री प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यांचा आणखी एक CCTV व्हिडीओ समोर आला आहे. लोहगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी हे दोघे एका कॅफेमध्ये गेल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, याच कॅफेमध्ये बसून केतन अग्रवालला संपवण्याचा कट रचण्यात आला होता.
समोर आलेल्या CCTV फुटेजमध्ये सिया आणि चेतन शांतपणे बसून चर्चा करताना दिसत आहेत. त्यानंतर काही वेळातच दोघे तेथून बाहेर पडले आणि पुढे लोहगडच्या दिशेने रवाना झाले. या फुटेजमुळे तपासाला मोठे वळण मिळाले आहे. पोलिसांनी कॅफेतील कर्मचाऱ्यांचे जबाब देखील नोंदवले आहेत.
विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वी केतनने सियाच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांचा खर्च करून जंगी सेलिब्रेशन केले होते. मात्र, त्याच सियाने प्रियकर चेतनच्या मदतीने केतनचा क्रूरपणे काटा काढल्याचा आरोप आहे.
Published on: Jun 25, 2026 05:23 PM
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...

