आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, ‘त्या’ नवदेवाची होतेय चर्चा
आज पहिल्या टप्प्यात मतदान करण्यास पात्र असणाऱ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये तरूण, वयस्कर आणि प्रौढांसह दिव्यांग मतदार आपले मतदान करत आहेत. अशातच रामटेकमधील एका तरूण मतदाराची सर्वत्र चर्चा होत असून त्यांनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
देशासह आज महाराष्ट्रातही लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. आज विदर्भात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आज पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा – गोंदिया, गडचीरोली आणि चंद्रपूर मतदारसंघात मतदान होत आहे. आज पहिल्या टप्प्यात मतदान करण्यास पात्र असणाऱ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये तरूण, वयस्कर आणि प्रौढांसह दिव्यांग मतदार आपले मतदान करत आहेत. अशातच रामटेकमधील एका तरूण मतदाराची सर्वत्र चर्चा होत असून त्यांनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रामटेकमध्ये एका नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी त्याचं मतदानाचा हक्क बजावला आहे. अंगावर शेरवानी, डोक्यावर पगडी, कपाळाला मुंडावळ्या बांधून लग्नाच्या वरातीसाठी घोड्यावर बसण्यापूर्वी नवरदेवाने आपलं कर्तव्य बजावले. स्वप्नील डांगरे असे या चर्चा होणाऱ्या तरूणाचे नाव असून लग्न मंडपात जाण्यापूर्वी तो मतदान केंद्रावर दाखल झाला आणि मत दिलं. योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण मतदान केलं पाहिजे असं यावेळी स्वप्नीलने सांगितले.
Published on: Apr 19, 2024 01:18 PM
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
