AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lok sabha Election Result 2024 : काँग्रेस नेत्यांचा निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप, नेत्यांचा आरोप काय? शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार

Lok sabha Election Result 2024 : काँग्रेस नेत्यांचा निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप, नेत्यांचा आरोप काय? शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Jun 04, 2024 | 4:16 PM
Share

आतापर्यंत एनडीएला 300 जागा गाठणं कठीण झाले आहे. तर, इंडिया आघाडीला 240 पेक्षा अधिक जागा मिळण्याचे संकेत दिसताय. दरम्यान, काँग्रेसचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटण्याचं कारण काय?

लोकसभा निवडणुकीचे कल आता हळूहळू समोर येताना दिसता. आतापर्यंत एनडीएला 300 जागा गाठणं कठीण झाले आहे. तर, इंडिया आघाडीला 240 पेक्षा अधिक जागा मिळण्याचे संकेत दिसताय. दरम्यान, काँग्रेसचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल उशिरा लागल्याचा काँग्रेस नेत्यांनी आरोप केला आहे. इतकंच नाहीतर मतमोजणीची गती कमी केली असल्याचेही काँग्रेसने म्हटलं. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. दरम्यान, राज्यातूनही काँग्रेसने मतमोजणीवर आरोप केला होता. पुण्याच्या कसब्यातील मतमोजणीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मतदानासाठी असणाऱ्या ईव्हीएम मशीनमध्ये ४ मिनिटं उशिराने आकडे दिसत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसने केलेल्या या आरोपानंतर कसब्यातील मतमोजणी काही वेळासाठी थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Published on: Jun 04, 2024 04:16 PM
Follow Us