Bhiwandi Lok sabha Election Result 2024 : भिवंडीत तुतारी वाजणार की कमळ फुलणार? बाळ्या मामा vs कपिल पाटील, कौल कुणाला?
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यात चुरशीचा सामना रंगला. सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि कपिल पाटील या दोघांच्या लढाईत आता कोण सरस ठरणार? भिवंडीत यंदा कमळ फुलणार की तुतारी वाजणार? याची उत्सुकता असताना निकालाचे आकडे काय?
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीची लढत आरोप प्रत्यारोपामुळे चांगलीच चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले. भिवंडी मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यात चुरशीचा सामना रंगला. सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि कपिल पाटील या दोघांच्या लढाईत आता कोण सरस ठरणार? भिवंडीत यंदा कमळ फुलणार की तुतारी वाजणार? याची उत्सुकता असताना आलेल्या एक्झिट पोलनुसार कपिल पाटील हे आघाडीवर तर बाळ्या मामा पिछाडीवर असल्याचे समोर आले होते. मात्र निकालाचा कल आज समोर येत असताना सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) हे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. भिवंडी येथील बाळ्यामामा म्हात्रे हे २३ हजार ५६४ मतांनी आघाडीवर असल्याचे चित्र सध्या आहे. तर हाती येत असलेल्या कलानुसार, विद्यमान भाजप खासदार आणि मंत्री कपिल पाटील यांना मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
Published on: Jun 04, 2024 01:34 PM
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
