AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार, खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा

ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार, खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा

| Updated on: Oct 06, 2026 | 12:00 PM
Share

दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाकडे लोकशाही वाचवा मोर्चा आयोजित केला आहे. संसद भवनापासून आयोगाच्या मुख्यालयापर्यंत निघालेला हा मोर्चा ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. मोर्चा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी आणि खर्गे यांच्यासह प्रमुख गटनेत्यांची रणनीती ठरवण्यासाठी बैठक सुरू आहे. हा विरोधी पक्षांचा एकवटलेला एल्गार आहे.

दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाला घेराव घालण्यासाठी लोकशाही वाचवा मोर्चा काढला आहे. विरोधी पक्षाचे खासदार संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे कूच करत आहेत. “ज्ञानेश कुमार हटाव” अशी मागणी करत विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. या मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षांच्या गटनेत्यांची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या आंदोलनामध्ये वर्षा गायकवाडदेखील सहभागी झाल्या असून त्यांनीही निवडणूक आयोगाला विरोध दर्शवला आहे.

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अन्य नेते या बैठकीत मोर्चाची पुढील रणनीती ठरवत आहेत. ही बैठक संपल्यानंतर खासदार निवडणुकीच्या आयोगाच्या मुख्यालयावर धडक देतील. याआधी काँग्रेस आणि ठाकरे गटाने स्वतंत्रपणे आंदोलने केली होती, मात्र आता इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी एकत्रितपणे हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

Published on: Oct 06, 2026 12:00 PM

Follow Us